Gaurav Gaikwad Logo GAURAV GAIKWAD
Gaurav Gaikwad Logo
Gaurav Gaikwad
Select Language / भाषा वापरा

स्वच्छंदी मनाला

आकारल्या रेषा,

विस्तारले आभाळ;

स्वच्छंदी मनाला,

ढगांचे आकार.


कडाडले ढग,

बरसले मेघ;

स्वच्छंदी मनाला,

विचारांचे गतेज.


निसर्गाचं गाणं,

गंधाळलेले स्वर;

स्वच्छंदी मनाला,

ग्रीष्मांचे बहर.


कधी मंतारलेले मन,

कधी भावनांचे क्षण;

स्वच्छंदी मनाला,

कधी वाऱ्याचे वळण.


आभाळाच्या पल्याड,

जाताय कुठं दूरवर;

स्वच्छंदी मनाला,

शब्द नसलेले स्वर.


स्वच्छंदी मनाला,

शब्दांचे ग सन;

विचारांच्या दरवळात,

गुंफलेले जीवन.


AUTHOR'S NOTE

शीर्षक

स्वच्छंदी मनाला



विषय

मन • निसर्ग • स्वातंत्र्य • विचार • कल्पनाशक्ती • अंतर्मन



भावार्थ

ही कविता स्वच्छंदी मनाच्या मुक्त प्रवासाची अनुभूती देते. मन कधी ढगांच्या आकारात तर कधी विजेच्या तेजात स्वतःला शोधते. निसर्ग, वारा, आकाश आणि विचार यांच्यातून ते सतत विस्तारत राहते. शब्दांच्या पलीकडील भावना आणि विचारांच्या सुगंधातून विणलेले जीवन ही या कवितेची मध्यवर्ती कल्पना आहे.

💬 Chat with Gaurav Tap to open WhatsApp Web and start a conversation!