Gaurav Gaikwad Logo GAURAV GAIKWAD
Gaurav Gaikwad Logo
Gaurav Gaikwad
Select Language / भाषा वापरा

सखी - शब्दांच्या मागे

तू तेव्हा तशी,

तू तेव्हा अशी,

तुझ्या छटा अगणित अंतरी.

कधी मंद छाया,

कधी तेजोनभी,

तूच सूर्य, अंतरीतून सुरभी.

कधी संध्याकाळ,

कधी मंद दिव्याची वात,

कधी अल्लड स्वप्न,

कधी उसळणारी लाट.

कधी वाऱ्यांवाटे

तुझी चाहूल यावी,

कधी विरहात दाटे

तुझी गंधाळ सावली.

तुझे असणे

कधी क्लिष्ट, कधी मोकळे सरळ;

तुझ्या स्पर्शाने विणले आयुष्य,

कधी गूढ, कधी तरळ.

तू नेहमी सोबतीला,

जसे जीवनाचे धागे;

कधी नजरेच्या छायेत,

कधी शब्दांच्या मागे.

AUTHOR'S NOTE

शीर्षक

सखी शब्दांच्या मागे



विषय

प्रेम • सहवास • विरह • स्मृती • अंतर्मन



भावार्थ

ही कविता एका अशा सखीची अनुभूती व्यक्त करते जी केवळ प्रत्यक्ष सहवासात नाही, तर आठवणींमध्ये, भावनांमध्ये आणि शब्दांच्या पलीकडेही जिवंत असते. तिचे अस्तित्व कधी मंद सावलीसारखे, कधी तेजस्वी सूर्यकिरणासारखे, तर कधी विरहाच्या गंधाळ सावलीसारखे जाणवते. कवीसाठी ती जीवनाच्या प्रत्येक धाग्यात विणलेली असून, तिची उपस्थिती नजरेतही आहे आणि शब्दांच्या पलीकडील शांततेतही.

साहित्यिक वैशिष्ट्ये
केंद्रीय भावना: प्रेम आणि अंतर्मनातील सहवास
रस: शृंगार, करुण आणि शांत
प्रतिमा: सूर्य, सावली, दिव्याची वात, वारा, विरह, जीवनाचे धागे
प्रतीक: "शब्दांच्या मागे" हे अव्यक्त प्रेम, न बोललेली भावना आणि निःशब्द नाते यांचे प्रतीक आहे.

💬 Chat with Gaurav Tap to open WhatsApp Web and start a conversation!