Gaurav Gaikwad Logo GAURAV GAIKWAD
Gaurav Gaikwad Logo
Gaurav Gaikwad
Select Language / भाषा वापरा

अंतरितला सूर्य

शब्द शब्द झाले मुके,

नभी काळोख दाटला;

बंड उद्रेक मनात,

मनी संकर पेटवा.

जातीवंत झाले मोठे,

दारी समाज बाटला;

येथे मनेच गोठली,

मनी संताप भेटला.

देव गेला या चोरीला,

शिल्लक देवाचा देव्हारा;

येथे धर्मच वेठीला,

मनी देवाला सापडा.

सगळे क्षणात पेटवा,

ज्योत मनात जागवा;

जळणारा सूर्य मोठा,

अंतरित तोही विझवा.

AUTHOR'S NOTE

शीर्षक
अंतरितला सूर्य

विषय
समाज • धर्म • आत्मजागृती • क्रांती • अंतर्मन • मानवता

भावार्थ
‘अंतरितला सूर्य’ ही कविता समाजातील अंधार, विभागणी आणि मूल्यांच्या ऱ्हासावर तीव्र भाष्य करते. शब्द निःशब्द झाले आहेत, मने गोठली आहेत आणि धर्मही माणुसकीऐवजी वेठीस धरला गेला आहे. अशा काळात कवी बाह्य संघर्षापेक्षा अंतर्मनातील क्रांतीची हाक देतो. प्रत्येकाच्या अंतःकरणात पेटणारा अहंकार, संताप आणि अंधार विझवून आत्मज्योत जागवण्याचे आवाहन ही कवितेची मध्यवर्ती भावना आहे.

साहित्यिक वैशिष्ट्ये
केंद्रीय भावना: अंतर्मनातील क्रांती आणि आत्मजागृती.
रस: रौद्र, वीर आणि शांत.
मुख्य प्रतिमा: सूर्य, काळोख, शंकर, देव्हारा, ज्योत.
प्रतीक:
अंतरितला सूर्य — अंतर्मनातील चेतना, ज्ञान आणि आत्मप्रकाश.
काळोख — अज्ञान, द्वेष आणि सामाजिक विघटन.
शंकर — परिवर्तन, संहार आणि नवसृजनाची शक्ती.
ज्योत — आशा, विवेक आणि जागृती.

💬 Chat with Gaurav Tap to open WhatsApp Web and start a conversation!